सर्व क्षेत्रांतील बातम्यांचा समावेश

नूतन नगराध्यक्ष सौ.पूजा सचिन विरकर व नगरसेविका सौ. चैताली अनिल शिंदे यांचा सत्कार सोहळा संपन्न.

Mrunalini Dadas

1/8/20261 मिनिटे वाचा

दहिवडी:(६जानेवारी)-'म्हसवड नगराच्या विकासाबरोबरच शिक्षण व सहकार यासाठी नूतन नगराध्यक्षा पूजाताई विरकर व त्यांचे सर्व सहकारी यांचे निश्चितपणे सहकार्य लाभेल 'अशी अपेक्षा कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन एम.डी दडस सर यांनी व्यक्त केले नवनियुक्त नगराध्यक्षा पूजा सचिन विरकर व नगरसेविका चैताली अनिल शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते

म्हसवड नगरपालिका निवडणूकीत मोठे मताधिक्य मिळवून यश मिळवले त्याबद्दल त सपत्नीक सत्कार करण्यात आला .यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे माझी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक विजय बनसोडे व शिक्षकबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सुशील त्रिगुणे यांनी सांगितले की नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच शालेय भौतिक सुविधांसाठी प्रयत्न करावेत तसेच शिक्षकांच्या शालेय अडचणी सोडाव्यात असे सांगून बँकेच्या ठेवी व इतर कामकाजाबाबत माहिती दिली .राकेश ओतारी यांनी नगराध्यक्ष यांना शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केले तसेच नवनाथ सावंत यांनी शालेय नगरपालिका हद्दीतील सर्वांच्या समस्या मांडल्या व त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे असे विनंती अशीविनंती केली. कार्यक्रमासाठी म्हसवड मतदार संघातील अनेक शिक्षक उपस्थित होते शेवटी अध्यक्ष व नगरसेवक व सर्व शिक्षकांच्या वतीने प्राथमिक शिक्षक बँकेने काढलेला कॅलेंडरचे प्रकाशन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर शेंडे यांनी केले.

आभार प्रशांतराव कारंडे सर यांनी केले