सर्व क्षेत्रांतील बातम्यांचा समावेश

विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा अहिल्या रत्न पुरस्काराने सन्मान.

-

M.D Dadas

6/18/20251 मिनिटे वाचा

कराड दिनांक 15:-अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित अहिल्यारत्न पुरस्कार सन्मान सोहळा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृति सदन कराड या ठिकाणी पार पडला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा आमदार रामहरी रुपनवर ,ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण जी काकडे, सद्गुरु श्री श्री साखर राजेवाडी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर, प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्यकारी अधिकारी बलवंत पाटील, शाहूवाडीचे योगीराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांना' अहिल्या रत्न 'पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यामध्ये आदर्श माता, सामाजिक ,आर्थिक, राजकीय, शैक्षणिक ,औद्योगिक व प्रशासन आदी क्षेत्र सामाविष्ट होती.अहिल्यादेवींच्या 300 व्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व क्षेत्रातील मिळून अशा सुमारे 141 महिलांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला .

यावेळी RTO सौरभ दडस, रवींद्र कोकरे, बाळासाहेब खरात, उत्तमराव गलांडे ,अशोकराव शेंडगे, विजय वाटेगावकर, हनुमंत दुधाळ, शंकर विरकर ,आबासाहेब गावडे, संभाजी काकडे, एम.डी दडस सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.