सर्व क्षेत्रांतील बातम्यांचा समावेश
शिक्षक, अधिकारी व कर्मचारी स्पर्धेत सातारच्या खेळाडूंची दमदार कामगिरी - खोखो संघ विजेता
Mrunalini Dadas
1/8/20261 मिनिटे वाचा


महाराष्ट्र देश न्यूज मराठी नेटवर्क ( मृणालिनी)सातारा - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सातारासिंधुदुर्ग व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्यासंयुक्त विद्यमानेआयोजित पहिल्या शिक्षक अधिकारी वकर्मचारी स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करतानाअंतिमसामन्यात सातारा जिल्ह्याने नाशिक विभागातील नंदुरबारसंघाचा रोमहर्षक लढतीत पराभव करत प्रथम क्रमांकाचामानकरी ठरण्याचा बहुमान मिळवला. या स्पर्धेत सातारासंघाने दणदणीत विजय मिळवल्याने जिल्ह्याच्या शिरपेचातमानाचा तुरा रोवला गेला आहे. साताऱ्याने या सुवर्ण यशानेखो - खो मध्ये आपला महाराष्ट्र राज्यात दबदबा निर्माणकेला आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पस वाढे, सातारा येथीलभव्य मैदानावर सदरच्या स्पर्धा पार पडल्या. कोल्हापूरविभागातील सातारा संघाने साखळी सामन्यात अमरावतीविभाग ( यवतमाळ) व पुणे विभागाचा (पुणे) दारुण पराभवकरत फायनल मध्ये प्रवेश मिळवला होता. सातारा संघातीलकर्णधार राहुल पावरा (निवकणे) रवींद्र ननावरे (भवानीनगर)चंद्रकांत पोळ (काळेवाडी) युवराज पावरा (पाळेकरवाडी)अमोल मडके (म्हात्रेवाडी) लक्ष्मण वाघ (देवापुर ) सुरेशजाधव ( कडवे खुर्द) शिल्पा निंबाळकर ( हस्तनपुर )आयेशा हवालदार (ल्हासुर्णे) शितल सावर्डेकर (पाडळोशी)शुभांगी सावळे (टकलेवाडी) देवीनंदा मळगणे ( वाटोळे )अश्विनी गुरव (मापरवाडी) लतिका इंगळे ( मांटीमुरा) यांनीअतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विशेषतः अंतिमसामन्यात रवींद्र ननावरे यांनी ४ मिनीटे. १० सेकंद संरक्षणकेले. यशस्वी संघातील खेळाडूंचे मा. यशस्वी नागराजनमॅडम (मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा ) मा. श्री नितीनतारळकर (जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा ) मा. श्री अनिनायकवडी ( शिक्षणाधिकारी सातारा ) मा. श्री रवींद्र खंदारे(उपशिक्षणाधिकारी सातारा ) मा. श्री अजिंक्य सगरे साहेब(उपाध्यक्ष यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा) मा. श्री जितेंद्रसाळुंखे (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थासातारा) प्रा. विजय कोकरे (अधिव्याख्याता सातारा) प्रा.कृष्णा फडतरे (अधिव्याख्याता सातारा) यांनी अभिनंदनकरून कौतुक केले. खेळाडूंच्या या भव्य दिव्य यशाने नवीनखेळाडूंमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यास निश्चितपणे मदतहोईल असे मान्यवरांनी मत व्यक्त केले. स्पर्धा यशस्वीकरण्यासाठी जिल्हा क्रीडा समन्वयक राजाराम तोरणे,विकास भुजबळ, युवराज कणसे, शिवाजी निकम, नवनाथकणसे, तानाजी पवार, सी. एम. जाधव, सत्यवान माळी,नवनाथ काशीद, सदानंद साबळे, श्रीगणेश शेंडे, सुनीताअरगडे, मनीषा साबळे, राधिका गायकवाड, भारत देवकांत,कुमार शिंदे उमेश येवले यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वीपार पाडण्यासाठी यशोदा शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य वत्यांची व्यवस्थापकीय सदस्य, शिक्षक व शिक्षकेतरकर्मचाऱ्यांनी बहुमोल असे सहकार्य केले.
समाचार
मराठीतील ताज्या बातम्या आणि माहिती मिळवा.
ब्लॉग
संपर्क
maharastradeshneswmarathi@gmail.com
9421176249
© 2025. All rights reserved.
संपर्क साधा आमच्याशी
ई-मेल
maharastradeshnewsmarathi@gmail.com
आपल्या प्रश्नांसाठी किंवा अभिप्रायासाठी आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्याला मदत करण्यास तयार आहोत.
संपर्क
9421176249
