सर्व क्षेत्रांतील बातम्यांचा समावेश

*"शिक्षण, शिक्षक व संघटना यांसाठी सदैव काम करत राहणार* " - *एम.डी.दडस सर*

दहिवडी :- देश प्रबळ आणि महासत्ता बनण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे.

M. D. Dadas

5/2/20251 मिनिटे वाचा

दहिवडी:- देश प्रबळ आणि महासत्ता बनण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक,आर्थिक व बौद्धिक विकास साधला जातो व त्यातूनच देश प्रगती करतो त्यासाठी शिक्षण, शिक्षक व संघटना यासाठी सदैव काम करत राहणार असे वक्तव्य कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे संचालक व सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा संपर्कप्रमुख श्री एम.डी.दडस सर यांनी काढले. ते सौ भारती अमृतराव शिंदे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी एल एम पिसे साहेब व प्रमुख पाहुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता विजय कोकरे साहेब उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त केली. तसेच शिक्षक बँक संचालक नितीन काळे, अध्यक्ष संतोष घोडके, विभागीय उपाध्यक्ष विजय खरात, केंद्रप्रमुख एम एस कदम केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड, तालुकाध्यक्ष सूरज तुपे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.